सरकारने आठ दिवसांत वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा! ग्राहकांकडून राज्यभर वीज बिलांची होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी  ग्राहकांनी मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, संभाजीनगर, अमरावती, नाशिक, मालेगाव, बुलडाणासह राज्यभर वीज बिलांची होळी केली. यावेळी सरकारने वीज बिल माफीबाबत आठ दिवसांत ठोस निर्णय घ्यावी अशी मागणी केली.

लॉक डाऊनमुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीज बिल माफ करावे म्हणून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय आणि महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली. कोल्हापूर येथे प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे आदी उपस्थित होते.