…तोपर्यंत लाइट बिल घेऊ नका! विक्रोळी, भांडुपच्या आमदारांचे विज वितरणला निवेदन

603

विक्रोळी आणि भांडुपमध्ये अनेकांना लाईटबिल वाढवून आले आहे. यामुळे कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य जनता आणखीनच हवालदिल झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन रिडिंग घेत नाहीत तोपर्यंत वीज बिल घेऊ नका, असे निवेदन शिवसेनेचे विक्रोळीतील आमदार सुनील राऊत आणि भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी वीज वितरण कार्यालयाला दिले.

शिवसेना आमदारांनी विज वितरण कार्यालयात जात अधिकाऱ्यांना खऱ्या समस्येची जाणीव करून दिली. वाढीव लाईट बिलाबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निवेदन दिले. जोपर्यंत विज वितरणचे अधिकारी मीटरचे नविन रिडींग घेऊन जात नाहीत तोपर्यंत कुणीही लाईटबिल भरू नये, असे आवाहन सुनील राऊत यांनी फेसबुकद्वारे केले होते. आज आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यांनी वाढीव बिलाविरोधात विज वितरणाचे कार्यालय गाठले. विज वितरण अधिक्षक अभियंता बुलबुले यांना निवेदन दिले. तसेच जोपर्यंत तुमचे अधिकारी मीटरचे नविन रिडींग घेऊन जात नाहीत तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांकडून सक्तीचे विजबिल वसूल करू नये अशी समज या अधिकाऱ्यांना दिली. विक्रोळी आणि भांडुप मतदारसंघातील नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी नगरसेवक उपेंद्र सावंत, सुवर्णा करंजे, उमेश माने, सर्व शाखाप्रमुख, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या