वीज केंद्रांमध्ये उभा राहणार सौरऊर्जा प्रकल्प

261

स्वस्त आणि मस्त ऊर्जा अशी ओळख असलेल्या सौरऊर्जा निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी महानिर्मितीने कंबर कसली आहे. सौरऊर्जा प्रकल्पाचे पॅनल बसवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जमीन अवश्यक असते. मात्र पुरेशी जागाच उपलब्ध होत नसल्याने महानिर्मिती आता औष्णिक वीज प्रकल्प परिसरात 52 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

एक मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे पाच एकरहून अधिक जमिनीची गरज असते. त्यामुळे 10-20 मेगावॅटपेक्षा मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारायचा असेल तर शेकडो एकर जमीन लागते. तसेच वीज प्रकल्प उभारणीपेक्षा जमिनीच्या खरेदीवर मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करावा लागतो. त्याची दखल घेत महानर्मितीने भुसावळ, कोराडी, परळी आणि नाशिक येथील औष्णिक वीज प्रकल्पांच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या शेकडो एकर जागेवर सौर पॅनल बसवून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यानुसार राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे प्रकल्प उभारणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या