50 फूट खोल विहिरीत पडली हत्तीण, 16 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सुखरूप बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या हत्तीणीला 16 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनंतर सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाच्या अधिकाऱयांना यश आले आहे. सोशल मिडियावर हा व्हिडियो व्हायरल होत असून हत्तीणीचं आणि तिच्या इच्छाशक्तीचे कौतुक होत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना तामीळनाडूतील धरमापुरीच्या पंचपली गावातील आहे. विहिरीत पडलेल्या हत्तीणीचा आवाज शेतकरी वेंकटचलम यांनी ऐकला. त्यानंतर त्यांनी गावकऱयांना ही माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱयांना याची माहिती मिळताच तत्काळ रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचीदेखील मदत घेण्यात आली. त्यानंतर तब्बल 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर व्रेनच्या मदतीने हत्तीणीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुटकेचा हा थरार पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. हत्तीणीला बाहेर काढताच नागरिकांनी एकच जल्लोष केला.