गजराजाने ठोकले चौकार-षटकार

सध्या सोशल मीडियावर गजराजाच्या क्रिकेटप्रेमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे, एक हत्ती आपल्या सोंडेत बॅट पकडून चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे तर इतरांनी त्याला आऊट करण्यासाठी, त्याची कॅच पकडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

मात्र हत्ती एखाद्या सराईत खेळाडूसारखा खेळतोय आणि प्रत्येक बॉलचा अंदाज घेऊन टोलवत आहे. त्याला आऊट करणं इतरांसाठी कठीण दिसतंय. एकूण काय तर हत्तीला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या