उपनगरीय लोकल प्रवाशांचे हाल कमी होणार, 10 हजार कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी

901
ladies-local-train

उपनगरीय लोकल प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी अंत्यत उपयुक्त असलेल्या पनवेल ते कर्जत उपनगरीय कॉरीडॉर (दुपदरीकरण), विरार ते डहाणू चौपदरीकरण आणि ऐरोली – कळवा एलिवेटेड लिंक या महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश असलेल्या 10,947 कोटी रूपयांच्या एमयूटीपी -3 प्रकल्पाला आज राज्य सरकारने मंजूरी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास महामंडळ, एमएमआरडीए, सिडको आणि राज्य सरकारदरम्यान मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प तीनच्या सामंजस्य करारावर आज सह्या झाल्या.

– ऐरोली ते कळवा एलिवेटेड (3 कि.मी.) लिंकमुळे कल्याण ते वाशी-पनवेल जाणाऱया प्रवाशांना ठाण्याला उतरण्याची गरज राहणार नसून थेट कल्याणहून वाशी लोकल पकडणे शक्य होणार आहे. त्यामुळे ठाण्याला होणारी कोंडी कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या