
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
कुठल्याही कर्मचार्याला महिन्याभराच्या अंतरात दुसरी नोकरी न मिळल्यास त्याला आपल्या प्रोव्हिडंड फंडमधील ७५ टक्के रक्कम काढता येणार. अशी घोषणा केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी केली आहे. सोमवारी लोकसभेत त्यांनी ही माहिती दिली.
गंगवार म्हणाले की ”कर्मचारी भविष्य निधीच्या विश्वस्तांची २२२ वी बैठक २६ जून रोजी पार पाडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.” या निर्णयानुसार एका महिन्यात ईपीएधारक कर्मचार्यास जर नोकरी नाही मिळाली तर तो आपल्या प्रोव्हिडंड फंड मधून ७५ टक्के रक्कम काढू शकतो. प्रश्न उत्तराच्या तासांत त्यांनी ही माहिती दिली.
तसेच कर्मचार्याकडे दोन महिने नोकरी नसेल तर तो अर्ज करून पूर्ण रक्कम काढू शकतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

























































