श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक, मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली

515

जम्मू-कश्मीरातील श्रीनगरमधल्या नवाकदल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री उशिरा चकमक उडाली. एका घरामध्ये काही दहशवादी लपून बसले असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या घराच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत गोळीबाराचे आवाज येत होते.या चकमकीमुळे श्रीनगरमधली मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या चकमकीनंतर मंगळवारी पहाटेपासून या संपूर्ण परिसराची पाहणी करण्याचे काम जवानांनी सुरू केले आहे. जम्मू कश्मीर पोलिसांनी ट्विटद्वारे चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की जम्मू कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवाननवाकदलमधल्या कनेमझार परिसरात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या