
अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) शिक्षक ः विद्यार्थी प्रमाण वाढवण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत. सर्व डीम्ड आणि स्वायत्त महाविद्यालयांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण ठेवावे असा नवा नियम एआयसीटीईने बनवला आहे. शासकीय महाविद्यालयांना मात्र 20:1 असे प्रमाण कायम ठेवण्यात आले आहे.
एआयसीटीईने गेल्याच आठवडय़ात आपली मान्यतेसंबंधी पुस्तिका काढली. त्यात विविध नव्या नियमांचा समावेश केला गेला आहे. इंजिनीयरिंग महाविद्यालयांनी 5 मार्चपर्यंत या नव्या नियमांप्रमाणे बदल करावा असे त्यात म्हटले आहे. शासकीय महाविद्यालयांमधील शिक्षक :विद्यार्थी सरासरी 15 : 1 अशी होती, परंतु शिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी शासकीय महाविद्यालयांनी परवानगी मागितल्यानंतर सर्वच शासकीय महाविद्यालयांसाठी हे प्रमाण 20ः1 असे करण्यात आले आहे.























































