
शेतकऱयांनी पिकवलेल्या भाज्या ग्राहकांपर्यंत पोचायला वेळ लागतो. त्यातच विव्रेते उन्हात भाजी विक्रीला बसतात. त्यामुळे भाजीपाला सुकून जातो. यावर तोडगा काढण्यासाठी म्हैसूर विद्यावर्धका इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलार मोबाईल रेफ्रिजरेटरची निर्मिती केली आहे. या रेफ्रिजरेटरमध्ये भाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतील.
नवीन एच. व्ही., सुभाष सैन, सुप्रीथ एस., विवेक चंद्रशेखर अशी सोलार मोबाईल रेफ्रिजरेटर तयार करणाऱया विद्यार्थ्यांची नावे आहेत. सोलार कार्टमध्ये एअरकुल चेंबर आहे. हे चेंबर सोलार एनर्जीवर चालते. भाज्यांसाठी 5 ते 10 डिग्री सेल्सियस तापमान लागते. विद्यार्थ्यांनी कार्टचे तापमान शून्य ते दहा अंश सेल्सिअस कसे राहील यादृष्टीने काम केलंय. त्यामुळे केवळ फळे पिंवा भाज्याच नव्हे, तर डेअरी प्रॉडक्टही दीर्घकाळ ठेवता येतील.

























































