इंग्लंडच्या कॉसिस ई-मोबिलिटी कंपनीसोबत 2 हजार 823 कोटींचा सामंजस्य करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शून्य उत्सर्जन व पर्यावरण पूरक वाहन निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने आज इंग्लंडच्या कॉसिस ई-मोबिलिटी कंपनीसोबत 2 हजार 823 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.

सह्याद्री अतिथीगृहावर या सामंजस्य करारावर सह्या झाल्या. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते. या गुंतवणूक करारामुळे एक हजार 250 रोजगार निर्माण होतील.

राज्यात कारखाना

कॉसिस समुहाद्वारे पहिल्या टप्प्यात ईव्ही बॅटरीचा पुरवठा करण्यासाठी यूके येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून दुसऱया टप्प्यात महाराष्ट्रात कारखाना उभारणार आहे. यामुळे राज्यातील विकसित ईको सिस्टमला चालना मिळेल. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर व नाशिक येथील सार्वजनिक वाहतुकीचा 25 टक्के वाटा असेल.

सुटय़ा भागांचे उत्पादन

तळेगाव टप्पा क्रमांक 5 येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारे सुटे भाग या ठिकाणी तयार होणार आहेत. प्रकल्प उभारून राज्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सक्षम करणे हा आहे. कॉसिस ई-मोबिलिटी ही इंग्लड येथील कंपनी असून ती शून्य उत्सर्जन ईव्हीचे उत्पादन व पुरवठा करते.