बेन स्टोक्सने पत्नीचा गळा दाबला अन्…

1293

इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा मैदानातील तसेच मैदानाबाहेरील कामगिरीनेही कायम चर्चेत असतो. बारमधील हाणामारी असो की त्याने इंग्लंडला स्वबळावर जिंकून दिलेला पहिलावहिला वर्ल्ड कप असो. सोशल साईटवर तो नेहमी झळकताना दिसतो. आता व्हायरल झालेल्या एका छायाचित्रामुळे तो पुन्हा प्रकाशझोतात आला. या छायाचित्रात त्याने पत्नी क्लेअरचा गळा दाबलेला दिसत आहे. हे छायाचित्र पाहून त्याच्यावर नेटीझन्सकडून टीका करण्यात आली. मात्र पत्नी क्लेअर हिने पती बेन याची बाजू मांडताना म्हटले की, त्या छायाचित्रात आम्ही भांडण करीत नसून एकमेकांसोबत मस्ती करीत आहोत.

बेन स्टोक्सवर चोहोबाजूंनी होत असलेली टीका पाहून क्लेअर म्हणाली, काय मुर्खपणा लावला आहे. लोक काही तर्क लावून टीका करत आहेत. मी आणि बेनने एकमेकांचा चेहरा असा पकडला आहे याचा अर्थ आम्ही भांडण करतो असे होत नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. आम्ही मस्ती करीत होतो. तसेच त्यानंतर आम्ही मॅकडोनाल्ड येथेही गेलो होतो, असे ती पुढे म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या