इंग्लंड क्रिकेटपटूंच्या मानधनात 15 टक्के कपात

कोरोना विषाणूमुळे क्रिकेटवरही परिणाम झालाय. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या मानधनात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून शुक्रवारी घेण्यात आलाय.

कसोटी संघाचा कर्णधार जो रूट व वन डे संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी आव्हानात्मक प्रसंगी जबाबदारी व परिपक्वता दाखवलीय, अशा शब्दांत संघाचे संचालक अॅश्ले जाईल्स यांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचे कौतुक केले.

इंग्लंड अॅण्ड वेल्स बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले की, या वर्षी 100 मिलियन युरोचे नुकसान झाले आहे. पुढच्या वर्षी 200 मीलियन युरोचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालीय. 62 व्यक्तींना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

एक वर्षासाठी कपात

इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून दरवर्षी करारबद्ध खेळाडूंची यादी तयार करण्यात येते. या खेळाडूंच्या मानधनात कपात करण्यात येणार आहे. रिटेनर, सामन्यांचे मानधन व विजयानंतरचा बोनस यामध्ये कपात केली जाणार आहे. पण ही कपात एक वर्षांसाठी असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या