वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या ‘या’ खेळाडूंना डच्चू

पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि पाच टी-२० मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. विश्वचषक सामन्यात खेळलेल्या 9 खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. मात्र, संघाची कमान जोस बटलरकडेच आहे.

इंग्लंडच्या वनडे संघातून 9 विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो, सलामीवीर डेव्हिड मलान, स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स, वरिष्ठ फलंदाज आणि माजी कर्णधार जो रूट या खेळाडूंचा संघात समावेश नाही. मात्र, विश्वचषक संघातील 6 खेळाडू संघात खेळणार आहेत. यामध्ये कर्णधार जोस बटलर, अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन, वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन, ब्रेंडन कारसे आणि अष्टपैलू सॅम कुरन यांचा संघात समावेश आहे.

दरम्यान ODI आणि T20I या दोन्ही संघांमध्ये जोश टंग आणि जॉन टर्नर या दोन खेळाडूंना स्थान दिले आहे. इंग्लंडला 3 डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर 12 डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. एकदिवसीय सामने अँटिग्वा (3 आणि 6 डिसेंबर) आणि बार्बाडोस (9 डिसेंबर) येथे खेळवले जातील. तर T20 सामने बार्बाडोस (12 डिसेंबर), ग्रेनेडा (14 आणि 16 डिसेंबर), आणि त्रिनिदाद (19 आणि 21 डिसेंबर) येथे खेळले जातील.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, हॅरी ब्रूक, ब्रेंडन कारसे, जॅक क्रॉली, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, ऑली पोप, फिल सॉल्ट , जोश तुंग आणि जॉन टर्नर.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गस ऍटकिन्सन, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग , रीस टोपली, जॉन टर्नर आणि ख्रिस वोक्स.