पाहुणे येती घरी! इंग्लंडचा संघ चेन्नईत दाखल

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये 5 फेब्रुवारीपासून क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमध्ये चार कसोटी, पाच टी-20 व तीन वन डे सामन्यांच्या थरार रंगणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ बुधवारी चेन्नईत दाखल झाला. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर हे मुंबईकर खेळाडूही मंगळवारी रात्री चेन्नईत  पोहोचले.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याच्यासह इंग्लंडचे उर्वरित खेळाडू बुधवारी हिंदुस्थानात दाखल झाले. याआधी बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, रोरी बर्न्स हे रविवारीच चेन्नईत आले होते. इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत केले. यानंतर श्रीलंकेमधून जो रूटचा संघ थेट हिंदुस्थानात आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या