#Ashes2019 स्टोक्सचे झुंजार शतक, कांगारूंच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला

813

हेडिंग्लेच्या मैदानावर झालेल्या अशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना अतिशय रोमहर्षक झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या लढतीत यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा एका विकेटने पराभव करत मालिकेत बरोबरी साधली. इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स. स्टोक्सने याने झुंजार शतकी खेळी केली. तसेच अखेरच्या विकेटसाठी स्टोक्सने जॅक लिचसोबत 76 धावांची मॅचविनिंग भागिदारीही केली.

चौथ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी ऑस्ट्रेलियाने 559 धावांचे आव्हान ठेवले होते. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 3 बाद 156 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी इंग्लंडने कर्णधार रूटची विकेट लवकर गमावली. त्यानंतर लागोपाठ विकेट गमावल्याने इंग्लंड बॅकफूटवर गेला. अखेर अष्टपैलू स्टोक्स इंग्लंडच्या मदतीला धावसा. स्टोक्सने 219 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 135 धावांची खेळी करत इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया – 179 आणि 246
इंग्लंड – 67 आणि 9 बाद 362

आपली प्रतिक्रिया द्या