प्रेक्षकांविना झालेल्या ऐतिहासिक कसोटीवर विंडीजची मोहोर, इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव

1036

कोरोना महामारीच्या संकट काळात प्रेक्षकांविना झालेल्या ऐतिहासिक कसोटीवर विंडीजने विजयी मोहोर उमटवली असून इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले आव्हान विंडीजने 6 गडी गमावून पार केले. विंडीजकडून ब्लॅकवुडने सर्वाधिक 95 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

जेसन होल्डरच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर विंडीजने इंग्लंडचा पहिला डाव 204 धावात गुंडाळला. यानंतर ब्रेथवेट आणि डाऊरिच यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 318 धावा करत 114 धावांची आघाडी घेतली. यानंतर गाब्रियल याच्या विकेटच्या ‘पंच’च्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव 313 धावात गुंडाळला. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 200 धावांचे आव्हान विंडीजने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

धावफलक –
इंग्लंड – 204 आणि 313
वेस्ट इंडिज – 318 आणि 6 बाद 200

आपली प्रतिक्रिया द्या