
कलाकारांना जसे कार्यक्रम पाहिजे असतात, तसे संस्थानाही कार्यक्रम हवे असतात. त्यामुळे मनोरंजनात्मक कार्यक्रम, ते सादर करणारे कलाकार-वादक, त्यांचे संपर्क क्रमांक एवढंच नव्हे तर नाटय़गृहांची यादी आदींची माहिती देणारी ‘सूत्रधार मनोरंजन कार्यक्रम सूची’ डिजिटल स्वरूपात रसिकांच्या हाती आली आहे. मनोरंजन सूचीचे यंदा 18 वे वर्ष असून ती रसिकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
विलेपार्ले येथे राहणारे सूत्रधार संस्थेचे स्वाती हर्डीकर आणि अनिल हर्डीकर 2004 पासून मनोरंजन सूची छापील स्वरूपात वाढत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मनोरंजन सूची डिजिटली प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. ही पीडीएफ स्करूपातील सूची विमान दहा जणांना फॉरवर्ड करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हर्डिकर कुटुंब हे स्वत: मनोरंजनाच्या क्षेत्रात आहेत. आई, बापमाणूस, पत्रोत्सव, याला जीवन ऐसे नाव, क्षण क्षण नवा क्षण आदी कार्यक्रम ते अनेक वर्षे करत आहेत. नवीन कलाकारांना संधी मिळावी. नवीन प्रयोग करणाऱयांचे कौतुक व्हावे. रसिक आस्वादक निर्माण करावेत. या हेतूने मनोरंजन सूची उपक्रम सुरू केल्याचे संपादिवा स्वाती हर्डीकर आणि अनिल हर्डीकर यांनी सांगितले. महाराष्ट्राबाहेरच्या मराठी मंडळांनाही या सूचीचा खूप चांगला उपयोग होत आहे. अगदी परदेशातही मनोरंजन सूची पोचल्याचे अनिल हर्डीकर यांनी सांगितले.
सूचीत काय आहे
204 पानांच्या मनोरंजनाच्या सूचीत कार्यक्रम आयोजकांची नावे, एकपात्री प्रयोगांची माहिती आहे. व्याख्याते, नृत्य, कथाकथन, कीर्तनकार, प्रवचनवार, जादू, शब्दभ्रम, द्विपात्री, शैक्षणिक, आगळेवेगळे, काव्यवाचन, नाटय़गृहे संपर्क, सांगितिक अशी वर्गवारी करून माहिती देण्यात आली आहे. विनामूल्य सूचीसाठी संपर्क- 9819340146























































