
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने मोठमोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाची क्रेझ अजूनही सिनेमागृहात पाहायला मिळत आहे, परंतु आता अवघ्या दोन दिवसांवर ‘बॉर्डर-2’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ‘धुरंधर’चा एक रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
‘बॉर्डर-2’ च्या ट्रेलरला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून पहिल्या 24 तासांत या चित्रपटाने ‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडला आहे. 24 तासांत जेवढा ‘धुरंधर’चा ट्रेलर पाहिला नव्हता, त्यापेक्षा जास्त ट्रेलर ‘बॉर्डर-2’ चा पाहिला आहे. तसेच ‘बॉर्डर-2’ च्या चित्रपटाचे बुकिंग सोमवारपासून सुरू झाले आहे. 24 तासांत या चित्रपटाने बुकिंगमध्ये जबरदस्त कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाचे 53 हजार तिकीट विकले गेले आहेत. यामुळे एकूण कलेक्शन 1 कोटी 69 लाख रुपये झाले आहे. हा सिनेमा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित ड्रामा आहे.

























































