शेर के बच्चे को छावा केहते है…. पाहा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘छावा’ चित्रपटाचा शहारे आणणारा टीझर

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर आज रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरसोबत त्याच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘स्वराज्याचा रक्षणकर्ता, धर्माचा संरक्षण करणारा… छावा’ अशी पोस्ट शेअर करत विकी कौशलने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये संभाजीराजे हजारो मुघलांच्या मध्ये फसलेले असतानाही अत्यंत निडरपणे लढा देताना दिसत आहेत. ते पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

या चित्रपटात औरंगझेबाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर अक्षय खन्नाला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या भूमिकेत आशुतोष राणा, सोयराबाईच्या भूमिकेत दिव्या दत्ता, येसू बाईच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसणार आहेत.