बॉलीवूड किंग शाहरुख खान आपल्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीबाबत बॉलीवूडमध्ये अनेकांना तिच्याबाबत चांगले अनुभव नाहीत. नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी आपल्या एका मुलाखतीत पूजा ददलानीबद्दल असे काही सांगितले की, त्यानंतर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. फरीदा म्हणाल्या, पूजा ददलानी शाहरुखला भेटूच देत नाही असा आरोप केला आहे.
नुकतेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसिरीजमध्ये फरीदा जलाल दिसल्या. दरम्यान त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्या आता शाहरुख खानच्या संपर्कात नाही. जेव्हा माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा शाहरुखशी बोलणे झाले होते, पण त्यानंतर ते त्याच्याशी कधीच बोलले नाहीत. फरीदान म्हणाल्या की, जेव्हा मी शाहरुखला फोन करते तेव्हा त्याची मॅनेजर फोन उचलते. माझ्याशी रुक्ष बोलते आणि माझा फोन शाहरुखपर्यंत पोहोचवतच नाही.
फरीदा म्हणाल्या की, त्यांना शाहरुखला सांगायचे आहे की तो खूप चांगले काम करतोय, त्याची मुलेही चांगले काम करत आहेत आणि हे सर्व पाहून मला फार आनंद होत आहे. शाहरुख त्यांच्यासाठी त्यांच्या मुलासारखा आहे. शाहरुख खान आणि फरीदा जलाल यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘कुछ कुछ होता है’मध्ये त्यांनी शाहरुख खानच्या आईची भूमिका केली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये त्यांनी काजोलच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. तर ‘कभी खुशी कभी गम’मध्ये त्या सईदाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. शाहरुख आणि फरीदा यांचे ट्युनिंग खूप सुंदर होतं, पण आता फरीदा यांना इच्छा असूनही त्याच्याशी बोलता येत नाही.