राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या हॉरर -कॉमेडी ‘स्त्री 2’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाला होता. त्यामुळे दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक त्याची वाट पाहत होते. येत्या 14 ऑगस्टला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी सध्या अॅडवान्स बुकींग सुरू असून चित्रपटाच्या आतापर्यंत 60 हजार पेक्षा जास्त तिकीट विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रदर्शित होण्यापुर्वीच ‘स्त्री 2’ ने अॅडवान्स बुकींगमधून तब्बल 2.23 कोटींचीची कमाई केली आहे.
‘स्त्री 2’ मध्ये राजरकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी , पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्या भूमिका आहेत. ‘स्त्री 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे . चित्रपटाची अॅडवांस बुकिंग पाहता लवकरच तिकिट विक्रीचा आकडा ‘1 लाख’ वर जाण्याची शक्यता आहे . ‘स्त्री 2’ चित्रपटाची गाणी ही लोकप्रिय झाली आहे आणि प्रेक्षकांकडून गाण्यांना चांगलीच पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
एक दिवस आधीच प्रदर्शित होणार चित्रपट
‘स्त्री 2’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी दोन दिवस उरले आहेत. आधी हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर अचानक निर्मात्यांनी ‘वो स्त्री है! वो कुछ भी कर सकती है’ अशी पोस्ट शेअर करत चित्रपट एक दिवस आधी 14 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे.