जे.जे.च्या एन्थॉल ग्रुपचे कलाप्रदर्शन

जे. जे. कला महाविद्यालयातील 1994 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत एन्थॉल ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या वतीने 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत कला प्रदर्शनाचे आयोजन आहे. या प्रदर्शनात 1994 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या कॅलिग्राफी, फोटोग्राफी, इंडियन फोक आर्ट फॉम, कोलाज आदी कलाकृतींचे दर्शन घडणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 14 डिसेंबरला दुपारी 1 वाजता अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी जे. जे. तील प्राध्यापकांचीदेखील उपस्थिती असणार आहे.