
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने आपल्या कोटय़वधी सदस्यांसाठी एक मोठा बदल केला आहे. ईपीएफओने आता आपल्या अधिकृत वेबसाईटवरून युनिव्हर्सल खात्याचा नंबर म्हणजेच यूएएन ऑक्टिव्हेशन आणि नवीन यूएएन जनरेट करण्याची सुविधा बंद केली असून आता या दोन्ही सेवा उमंग ऍपवर हलवण्यात आल्या आहेत.
सुरक्षा मजबूत करण्यासाठी आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर ऑनलाइन सेवा जलद आणि अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यूएएन सक्रिय झाले की नाही हे तपासण्यासाठी उमंग ऍपमध्ये यूएएन सर्विस थ्रो फेस ऑथ अंतर्गत यूएएन अलोटमेंट अँड ऑक्टिवेशन पर्यायावर जावे लागेल.




























































