Epstein Sex Scandle – डोनाल्ड ट्रम्प यांचा टॉवेलमधील फोटो आणि 17 फाईल्स न्याय विभागाच्या वेबसाईटवरून गायब

अख्ख्या जगात खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणातील लाखो दस्तावेज अमेरिकेच्या न्याय विभागाने शनिवारी जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या काही ‘लीला’ नव्या छायाचित्रातून उघड झाल्या आहेत. यात फोटोंमध्ये ट्रम्प टॉवेलवर दिसत असून या नव्या फोटोंनी जगभरात खळबळ माजली आहे. दरम्यान हे फोटो समोर आल्याच्या काही तासानंतरच अमेरिकेच्या न्याय विभागाच्या वेबसाईटवरून ते गायब झाले आहेत. यात डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो देखील आहे.

एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणातील लाखो दस्तावेज अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास जाहीर केल्यानंतर जगभरात खळबळ माजली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, ब्रिटनचे प्रिन्स अँड्रय़ू, अब्जाधीश रिचर्ड ब्रेसनन, स्टीफन हॉकिंग यांच्यासह अनेक दिग्गजांची छायाचित्रे या दस्तावेजात आहेत. ट्रम्प आणि क्लिंटन यांची यापूर्वीही काही छायाचित्रे जाहीर करण्यात आली होती. यावेळी क्लिंटन आणि ट्रम्प यांच्या काही ‘लीला’ नव्या छायाचित्रातून उघड झाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी एपस्टीन प्रकरणातील 68 छायाचित्रे जारी करण्यात आली होती. त्यानंतर 19 तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अमेरिकेच्या न्याय विभागाने बरीच उशिरा ही सर्व माहिती सार्वजनिक केली. यात बरीच माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे असल्याचे न्याय विभागाने म्हटले आहे. सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त फोटो आणि इतर कागदपत्रांसह 3 जीबीपेक्षा जास्त क्षमतेच्या या सर्व फाईल्स आहेत. आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त पीडितांची ओळख पटली आहे. मात्र, त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

अल्पवयीन असल्याचे पुरावे मागायचा एपस्टीन

नव्या फाईल्समधून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींना एपस्टीन हा ओळखपत्र मागायचा. एका कागदपत्रातील उल्लेखानुसार, एपस्टीन या मुलींच्या वयाचा पुरावा मागायचा. या स्कँडलमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच एपस्टीनच्या निशाण्यावर असायच्या.