26 लाख बहिणींच्या ई-केवायसीमध्ये चुका, दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थींना महिला आणि बालविकास विभागाने चूक सुधारण्याची संधी दिली आहे. त्यानुसार लाभार्थी महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ही चूक सुधारता येईल. त्यानंतर यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजेनचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला होता. त्यासाठी वेबपोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र ई-केवायसी करताना जवळपास 26 लाख लाभार्थी महिलांनी नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला. त्यामुळे या महिलांना लाभापासून वंचित राहावे लागणार होते. या पार्श्वभूमीवर पर्याय निवडताना केलेली चूक दुरुस्त करण्यासाठी लाभार्थींना 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.