Euro Cup 2024: जर्मनी बाद फेरीत

युरो कप फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगलेला असून जर्मनीने हंगेरीविरुद्धच्या सामन्यात सलग दुसऱया विजयाची नोंद करत स्पर्धेतील आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. जर्मनीने हंगेरीचा 2-0 अशा फरकाने सहज पराभव करत स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखत बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. जर्मनीच्या जमाल मुसियाला आणि इल्के गुंडोगन यांच्या गोलमुळे हा विजय सोपा झाला.

युरो स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात जर्मनीने स्कॉटलंडचा 5-1 ने धुव्वा उडवला होता. दुसऱया सामन्यात हंगेरीचा पराभव करत स्पर्धेतील सलग दुसऱया विजयाची नोंद केली. या सामन्यात हंगेरीने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता, मात्र जर्मनीने आपले काwशल्य पणाला लावून हंगेरीच्या खेळाडूंवर दबाव निर्माण केला. जर्मनीच्या खेळाडूंनी हंगेरीच्या खेळाडूंना फायदा घेऊ दिला नाही. 23 व्या मिनिटाला जमाल मुसियालाने पहिला गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. मुसियाला याच्या गोलमुळे हंगेरीने बचावात्मक पवित्रा स्वीकारला. एकीकडे बचावाची खेळी करताना हंगेरी गोल करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र पहिल्या हाफमध्ये त्यांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱया हाफमध्ये 67 व्या मिनिटाला इल्के गुंडोगनने गोल करत जर्मनीला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. हंगेरीने अनेक प्रयत्न करूनही त्यांना एक गोलही करता आला नाही.