पंतप्रधान मोदी परदेशातही हिंदीत बोलतात तर आपल्याला का लाज वाटते? – अमित शहा

पंतप्रधान मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हाही हिंदीत संवाद साधतात तर आपल्याला हिंदी बोलायची का लाज वाटली पाहिजे असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीचे मुल्यांकन त्यांचे गुण पाहून केले जातात असेही शहा म्हणाले. आज दिल्लीत हिंदी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अमित शहा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा आंतराष्ट्रीय स्तरावर जातात तेव्हा ते हिंदीत बोलतात. जर पंतप्रधान मोदींना आपली भाषा बोलताना लाज नाही वाटत तर अपल्याला का हिंदीत बोलताना का लाज वाटते. भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या अंगीभूत असलेल्या गुणांमुळे होते. ती व्यक्ती कुठल्या भाषेत बोलते त्यावरून तिचे मूल्यमापन होत नाही. अनेक देशांनी आपल्या भाषेचा सन्मान करून तिचे जतन करून व्यापार, विज्ञान सारख्या क्षेत्रात प्रगती केली आहे. आपणही आपली भाषा बोलताना लाजले नाही पाहिजे असे शहा यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या