कोपरखैरण्यात नागरिकांचे सरसकट स्क्रिनिंग; कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्णय

756
फोटो- प्रातिनिधीक

नवी मुंबई शहरात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जात असलेल्या कोपरखैरणे परिसरात नागरिकांचे सरसकट स्क्रीनिंग महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मंगळवारी 300 नागरिकाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये आठ जण संशयित आढळले आहेत.

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा एक हजार 700 वर गेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण कोपरखैरणे आणि नेरूळ विभागातील आहेत. कोपरखैरणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. या भागात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांचे सरसकट स्क्रिनिंग सुरू केले आहे. मंगळवारी सेक्टर 18 मधील 280 नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यामध्ये आठ जण संशयित आढळले असून त्यांना वाशी येथील कोव्हीड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. कोपरखैरण्यामध्ये तीन दिवस स्क्रिनिंग चालणार आहे. ज्या ठिकाणी रुग्ण जास्त सापडले त्या सर्व ठिकाणी नागरिकांची सरसकट वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या