दिल्ली निवडणूक-  काँग्रेसकडून दिवंगत माजी पंतप्रधान शास्त्रींच्या नातवाला उमेदवारी

411

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाने आपली 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनेही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांना उमेदवारी दिली आहे. तसेच अलका लांबा यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आदर्श शास्त्री आणि अलका लांबी हे दोघेही आधी आम आदमी पक्षा होते. काही दिवसांपूर्वीच ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

काँग्रेसने 54 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने 8 महिलांना तिकीट दिले आहे. आदर्श शास्त्री शनिवारी काँग्रेसमध्ये सामील झाले, त्याच दिवशी त्यांना तिकीट देण्यात आले. आपशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अलका लांबा यांनाही काँग्रेसने तिकीट दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या