माजी क्रिकेटपटूंचा अनुभव वाया घालवू नका – द्रविड

250

माजी क्रिकेटपटूंचा अनुभव फार मोलाचा ठरू शकतो. तो वाया घालवू नका, त्याचा उपयोग करा असा सल्ला राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनी देशातील विविध राज्य संघटनांना दिला आहे. निमित्त होते बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारचे. बीसीसीआयशी सलंग्न असलेल्या सदस्यांसाठी या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राहुल द्रविड यांच्या सोबत बीसीसीआय – राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी वैद्यकीय प्रमुख सुजित सोमासुंदर व ट्रेनर आशीष कौशिक यांचाही सहभाग होता. यावेळी राहुल द्रविड यांनी सध्या व्हर्च्युअल ट्रेनिंगला सुरुवात करू शकतो. त्यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावू शकते, असेही सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या