गोव्यात माजी आरोग्यमंत्री सुरेश आमोणकरांचे कोरोनामुळे मृत्यू, मृत्यूसंख्या 8 वर

772

गोव्यात कोरोनाचा आठवा बळी गेला आहे. माजी आरोग्यमंत्री तथा डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोविड इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डॉ. आमोणकर यांच्या निधना बद्दल दुखः व्यक्त केले आहे.

गोव्यात आज कोरोनाचे 52 रुग्ण आढळले आहेत. तर 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोव्यात आतापर्यंत 1 हजार 813 रुग्ण सापडले असून त्यातील 745 सक्रिय असून 1 हजार 61 जण बरे झाले आहे. 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे अजुन देखील परिस्थिती गंभीरच आहे. वास्को मधील मांगोर हिल मधील रुग्ण कमी होऊ लागले आहेत. आज मांगोर हिल मध्ये 99 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत रुग्णाची संख्या काही कमी झालेली नाही. मांगोर हिलशी निगडीत रुग्णांची संख्या 238 आहे.

आपली प्रतिक्रिया द्या