अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सुचवले तीन उपाय

3611

कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. कोरोनापुर्वी ऑटो, टेलिकॉम सेक्टर संकटात सापडले होते. आता कोरोना काळात सामान्य नागरिकांरा रोजगार जात असून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक उद्योगांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण आगामी काळात अर्थव्यवस्था सांभाळण्यसाठी मोठी पावलं उचलावी लागतील असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केले आहे.

BBC शी बोलताना सिंह यांनी मोदी सरकारला अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी तीन उपाय सुचवले आहेत. त्यापैकी पहिला उपाय म्हणजे सामन्य नागरिकांचा रोजगार वाचला पाहिजे यासाठी सरकारने पावले टाकणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांना आर्थिक मदत देऊन त्यांची खर्च करण्याची क्षमता राखली पाहिजे असे सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सिंह यांनी दुसरा उपाय सांगितला आहे की व्यापार आणि उद्योगांना कर्ज देऊन त्यांचे उद्योग सांभाळले पाहिजे. तर तिसरा उपाय असा की आर्थिक क्षेत्रातील अनेक संस्थांना स्वायत्ता देऊन त्यांची धोरणे सुधारली पाहिजे. पुढील काही काळात देशावर आर्थिक संकट येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला पण हे आर्थिक नैराश्य नाहे असेही त्यांनी नमूद केले.

फक्त डॉ. सिंह यांनीच नव्हे तर रिझर्व्ह बँकेनेही कोरोना काळात अर्थव्यवस्थेवर संकट कोसळेल असा अंदाज व्यक्त केला होता. जर कोरोना संकट आपण निभावून नेले तर त्याचा अनुकूल प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडेल. पण कोरोनाचे संकट वाढणे, चांगल्या पावसाचा अभाव, जागतिक अर्थकसंकटामुळे देशातील अर्थव्यवस्थेवरही त्याचा प्रभाव पडला असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या