माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व्हेंटिलेटरवर, शस्त्रक्रियेनंतरही प्रकृती चिंताजनक

1439
pranab-mukherjee

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची तब्येत खालवत चालली आहे. आज त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही त्यांची तब्येत सुधारली नाही. मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

मुखर्जी यांनी दिल्लीच्या सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. शस्त्रक्रिया केल्यानंतर या गाठे काढण्यात आल्या होत्या. पण तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही. त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर निगराणी ठेवून आहे.

प्रणब मुखर्जी यांचे वय 84 आहे. सोमवारी ट्विट करून त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. तसेच जे कोणी आपल्या संपर्कात आले होते त्यंनी क्वारंटाईन करून कोरोना चाचणी करावी असे आवाहन केले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल रुग्णालयात जाऊन मुखर्जी यांच्या तब्येतीची माहिती घेतली. मुखर्जी यांनी सोमवारी आपली कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या फोनवरून चर्चा केली होती. मुखर्जी बरे व्हावे म्हणून संपूर्ण देशात प्रार्थना होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या