रायगडात प्रवाशांनी भरलेली बस उडवण्याचा डाव उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अलिबाग

पुलवामात सीआरपीएफच्या गाडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवानांच्या रक्ताचे पाट वाहिले असतानाच रायगड जिह्यातही प्रवाशांनी भरलेली एसटी शक्तिशाली बॉम्बने उडवण्याचा कट वाहकाच्या सतर्कतेमुळे उधळला. कर्जतहून खालापूरच्या आपटा येथे निघालेल्या एसटीतून प्रवासी उतरल्यानंतर वाहकाला जिवंत बॉम्ब दिसला. त्याने तातडीने पोलिसांना कळवताच बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन हा आयईडी बॉम्ब निकामी केला. 3 किलो युरिया, डिटोनेटर आणि आयईडी डिव्हाईस असलेल्या या बॉम्बचा बसमध्ये प्रवासी असताना स्फोट झाला असता तर पुलवामासारखा आणखी एक महाभयंकर घातपात घडला असता. या घटनेमुळे दहशतवादाचे रायगड कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले असून संपूर्ण जिह्यात हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे रायगड जिह्यात खळबळ उडाली.