परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा भाजपमध्ये औपचारिक प्रवेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकार 2.0 मध्ये परराष्ट्र मंत्रीपदावर विराजमान असणारे एस जयशंकर यांनी सोमवारी औपचारिकरित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत एस. जयशंकर यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी भाजप नेते कैलास विजयवर्गीय, भाजपचे सरचिटणीस भुपेंद्र यादव उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने दणदणीत यश मिळवल्यानंतर दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. मोदींच्या कॅबिनेटमंतध्ये एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्रमंत्रीपदाची सूत्रं सोपवण्यात आली. याआधी सुषमा स्वराज यांच्याकडे हे मंत्रीपद होते.