दिग्गज खेळाडूचे प्रेयसीसोबतचे ‘सेक्स टेप’ ब्लॅकमेलरच्या हाती, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोक आपल्या कुटुंबियांसोबत, आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवत आहे. अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू एजेकियल लवेजी (35) हा देखील ब्राझीलियन मॉडेल आणि अभिनेत्री नतालिया बोरगेससोबत कॅरेबियन आईसलँडवर (बेटावर) खास क्षणांचा अनुभव घेण्यासाठी गेला होता. मात्र त्याच्या हे चांगलेच अंगलट आले आहे.

एजेकियल लवेजी (ezequiel lavezzi) याचे प्रेयसीसोबतचे खासगी क्षण (सेक्स व्हिडीओ) एका ब्लॅकमेलरच्या हाती लागले असून त्याने ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी लवेजी याने न्यायालयात धाव घेतली आहे.

लवेजी याने आपल्या तक्रारीत म्हटले की, मला ब्लॅकमेल केले जात आहे. तसेच प्रत्येक व्हिडिओसाठी 5 हजार डॉलर (4 लाख रुपये) दिले नाहीत, तर, सेक्स व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल केले जातील. लवेजी याच्यासह नतालियालाही सोशल मीडिया अकाउंटवरून धमकी दिल्या जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या