झेंडूच्या फुलांचा फेसपॅक चेहऱ्यावर आणेल चमक, जाणून घ्या कसा करायचा तयार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुले कोणाला आवडत नाहीत? सगळेच लोक कोणाला तरी भेटवस्तू देण्यासाठी किंवा घरातील पूजा आणि सजावटीमध्ये वापरण्यासाठी फुलांचा वापर करतात. हिंदुस्थान घरांमध्ये फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. घराच्या सजावटीसाठी बहुतेकदा फुलांचा वापर केला जातो. परंतु काही फुलांचा वापर त्वचा आणि सौंदर्याची निगा राखण्यासाठी देखील केला जातो. झेंडू हे एक असं फूल आहे ज्याचा आपण सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वापर करू शकतो. झेंडूचे फूल त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते, कारण त्यात अनेक विषाणूविरोधी आणि जळजळ थांबवणारे गुणधर्म असतात.

झेंडूच्या फुलांचा तुम्ही फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. या फेसपॅकचा चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास, तेलकट त्वचा किंवा संवेदनशील त्वचा असल्यास त्यावर इलाज म्हणून आणि अँटी-एजिंग म्हणून फायदा होतो.  झेंडूच्या फुलांपासून बनवलेला फेस पॅक हा त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ ठेवण्यासही मदत करतो. हा फेसपॅक  कसा तयार करायचे ते वाचा

  • सर्वप्रथम झेंडूची फुले नीट धुवून घ्यावीत
  • त्याच्या पाकळ्या वेगळ्या काढून घ्याव्यात
  • या पाकळ्यांची पेस्ट बनवून त्यात ऑलिव्ह तेल टाकावे
  • हे मिश्रण चेहऱ्यावर लावा
  • 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाका
  • हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा