तोंड दाखवाल तरच नवे सिमकार्ड मिळेल

9

सामना ऑनलाईन, मुंबई

सिमकार्ड खरेदी करताना पुरावा म्हणून आधारकार्डाची सक्ती करण्यात आली आहे. आधारकार्डाच्या आधारे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आत्तापर्यंत बोटाचे ठसे घेणे आणि आयरिस स्कॅनचा(डोळ्यांच्या आधारे ओळख पटवणे) वापर केला जात होता. UIDAI म्हणजेच विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आता यामध्ये चेहऱ्यावरून ओळख पटवण्याचाही समावेश केला आहे. बऱ्याच वयोवृद्धांना बोटाचे ठसे पुसट झाल्याने आधारद्वारे ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून फेशिअल रेकग्निशन म्हणजेच चेहऱ्याद्वारे ओळख पटवण्याचा पर्याय पुढे आला आहे.

प्राधिकरणाने नवा पर्याय वापरण्याची सक्ती केली आहे. हा पर्याय न वापरल्यास संबंधित कंपनीच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाऊ शकतो. वृद्ध व्यक्तींसोबतच शेतकरी किंवा कष्टाची कामं करणाऱ्यांच्याही बोटाचे ठसे पुसट होतात, या सगळ्यांना नव्या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे नवे सिमकार्ड किंवा डुप्लिकेट सिमकार्ड मिळविणे , रेशनचं धान्य मिळवण्यासाठी, सरकारी कार्यालयांमध्ये हजेरी लावण्यासाठी केला जाईल. एकदा आधार ओळख प्रक्रियेसाठी चेहऱ्याने ओळख पटवली की चेहऱ्याची ओळख संबंधित व्यक्तीला वारंवार पटवण्यासाठी जेव्हा लाभ घ्यायचा आहे किंवा हजेरी लावायची आहे तेव्हा जावं लागेल.

विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दूरसंचार कंपन्यांना नव्या सिमकार्डांसाठी आधार ओळख प्रक्रियेत १५ सप्टेंबरपासून  महिन्याला १० टक्के ग्राहकांची ओळख पटवण्याचे काम हे चेहरा ओळख पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. १० टक्क्यांपेक्षा कमी ग्राहकांची आधार ओळख ही वेगळ्या पद्धतीने करण्यात आली तर त्यांना प्रत्येक जोडणीमागे २० पैसे दंड आकारला जाईल. जर सिमकार्ड किंवा अन्य बाबींसाठी आधार कार्डाऐवजी दुसरी कागदपत्रे पुराव्यासाठी देण्यात आली तर या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या