कॉलेज विद्यार्थ्यांसाठी फेसबुक घेऊन येत आहे ‘कॅम्पस फीचर्स’

605

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकची सुरुवात कॉलेज ‘कॅम्पस’मध्ये झाली होती. मार्क झुकरबर्गने हार्वर्डमध्ये शिक्षण घेत असताना आपल्या हॉस्टेलच्या खोलीतून याची सुरुवात केली होती. आता फेसबुक ‘कॅम्पस’ नावाने एका नवीन फिचर्सची टेस्टिंग करत आहे. कॅम्पस नावाच्या फीचर्सचे अॅक्सेस  फक्त कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामध्ये लॉग इन करण्यासाठी कॉलेज आयडीची आवश्यकता असणार आहे.

हाँगकाँग मधील हॅकर Jane Manchun Wong हिने फेसबुकवर येणाऱ्या या फीचर्स बद्दल सर्वात आधी ट्विट केलं आहे. Jane ही कोणतेही मोबाईल ॲप आणि साईट लॉन्च होण्याआधीच त्याबद्दल माहिती देत असते. तिने ट्विट करत म्हटले आहे की, ‘फेसबुक कॅम्पस या फीचर्स वर काम करत आहे. हे फीचर फक्त विद्यार्थ्यांसाठी असेल. यामध्ये ग्रुप इव्हेंट सारखे ऑप्शन असतील.’ या ट्विटमध्ये तिने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये कॅम्पस फीचर्स आपण पाहू शकता. यात तुम्हाला तुमच्या कॉलेज विषयाची माहिती नोंदवावी लागेल.  यानंतरच तुम्ही तुमच्या कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांशी कनेक्ट करू शकाल.

फेसबुक आता आपले लक्ष टीनेजर्सकडे फोकस करत असल्याचे यावरून दिसून येते आहे. कारण अमेरिकेत टीनेजर्स फेसबुक ऐवजी इंस्टाग्राम आणि स्नॅप चार्ट या सोशल मीडिया माध्यमांचा जास्त वापर करतात. एक अहवालानुसार 2014-15 मध्ये जवळपास 71 टक्के टीनेजर्स फेसबुक ॲपचा वापर करत होते. मात्र 2018 मध्ये ही संख्या कमी होऊन 51 टक्के इतकी झाली आहे. दरम्यान फेसबुकचे कॅम्पस फीचर्स कधी लॉन्च होणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप कळू शकलेले नाही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या