फेसबुकवर महिलेची बदनामी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुकवर महिलेचे बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस फेसबुकच्या व्यवस्थापनाची मदत घेणार आहेत. तक्रारदार या उपनगरात पालकांसोबत राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांनी फेसबुकवर अकाउंट तयार केले होते. त्यांनी काही फोटो पोस्ट केले होते.

महिलेच्या नावाचे कोणीतरी बनावट फेसबुक पेज बनवल्याचे तिच्या एका मित्राच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती महिलेला दिली. अज्ञात व्यक्तीने नकोसे फोटो त्या फेसबुक वॉलवर पोस्ट करून घाणेरडय़ा शब्दात टिप्पणी केली होती. तसेच त्यात महिलेचा नंबर अपलोड केला होता. फोन करणारे हे महिलेसोबत अश्लील भाषेत बोलत असायचे. सततचे येणारे फोन पाहता महिलेने याची माहिती तिच्या मित्राला दिली. महिलेने दिंडोशी पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.