फडणवीस सरकार पाकिस्तानातून कांदा आयात करणार

कांदा निर्यातीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे. मात्र कांदा उत्पादन घटल्याचे कारण पुढे करत फडणवीस सरकारने पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा घाट घातला आहे. दोन हजार टन कांदा आयातीसाठी निविदादेखील काढण्यात आल्याने कांदा उत्पादकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कांद्याला निर्यातीसाठी 10 टक्के एमईआयएस दर लागू राहील, असे केंद्र सरकारने 28 डिसेंबर रोजी जाहीर केले होते. मात्र ही योजना 11 जूनला अचानक बंद करण्यात आली. खरीप हंगामात अपेक्षित कांदा उत्पादन झाले नाही. परिणामी कांद्याचे दर प्रति 50 रुपयांपर्यंत गेल्याचे कारण पुढे करत महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कार्पेरेशन) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे.

दोन हजार टन कांद्यासाठी ‘एमएमटीसी’ने काढल्या निविदा

‘एमएमटीसी’ने काही दिकसांपूर्की पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशांतून कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढली होती. दोन हजार टन कांदा आयात करण्यासाठी 24 सप्टेंबरपर्यंत आकेदन मागकले आहे. यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये बोली लावावी लागणार असून कमीत कमी 500 टन कांद्यासाठी बोली लावावी लागेल, अशी अट आहे. याची कैधता 10 ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या