बनावट कागदपत्रांद्वारे वाहन कर्ज घेऊन बँकेला साडेसात लाखांचा गंडा

बनावट कागदपत्रांद्वारे द वाई अर्बन बँकेकडून 7 लाख 50 हजारांचे वाहन कर्ज घेउन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल बाळासाहेब (दिघे, रा. मांजरी), रोहित मारूती चासकर,आणि कुणाल प्रसाद कुलकर्णी (दोघेही  रा.  नNहे)   अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वैशाली सावंत (वय  37, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील द वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वैशाली शाखा व्यवस्थापिका आहेत. आरोपी कुणालने 2017 मध्ये जामिनदार रोहित व कुणाल कुलकर्णी यांच्या संगनमताने  द वाई अर्बन बँकेकडून 7 लाख 50 हजारांचे वाहन कर्ज घेतले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपींनी संबंधित वाहनावर  खराडीतील बँक ऑफ इंडियाकडूनही कर्ज घेतले. त्यापुर्वी तिन्हीही आरोपींनी द वाई बँकेत बनावट इन्शुरन्स पॉलिसी आणि इतर कागदपत्रे जमा करून 7 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या