बोगस कोविड अधिकार्‍यांनी पादचार्‍यास लुटले; एकाला अटक, दुसर्‍याचा शोध सुरू

457

कोविड अधिकारी असल्याची बतावणी करून दोघा भामटय़ांनी एका पादचार्‍याला लुटल्याची घटना चेंबूर येथे घडली होती. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चेंबूर पोलिसांनी शिताफिने तपास करून एका आरोपीला पकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली. दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

लालडोंगर परिसरात राहणारे अब्दुल शेख (49) हे चेंबूर स्टेशनच्या दिशेने जात असताना दोघांनी त्यांना अडवले. कोविड अधिकारी असल्याची ओळख सांगून त्यांनी अब्दुल यांच्याकडील बॅग तपासायला घेतली. त्याचवेळी दोघांनी चलाखीने अब्दुल यांचे एटीएम कार्ड व त्याचा पिन नंबर घेऊन नंतर त्याआधारे एटीएममधून 54 हजार रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच अब्दुल यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. तेव्हा आरोपींनी जी गाडी वापरली होती तिचा शोध घेऊन सोहन वाघमारे या भामटय़ाला पकडले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या