भाडेतत्त्वावरील जमीन रिकामी करा, न्यायालयाचे वांद्रय़ातील सोसायटीला आदेश; अमरोही कुटुंबीयांना 34 वर्षांनी दिलासा

बॉलीवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी व तिचे पती कमल अमरोही यांच्या कुटुंबीयांना मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाकडून 34 वर्षांनी दिलासा मिळाला आहे. अमरोही यांनी वांद्रय़ाच्या पाली हिल येथील भाडेतत्त्वावर दिलेला भूखंड सहा महिन्यांत परत करण्याचे आदेश न्यायालयाने गृहनिर्माण सोसायटीला दिले आहेत.