फॅमिली स्टोअर्सचे मालक शिवराम जोशी यांचे निधन

1664

दादरच्या छबिलदास गल्लीतील फॅमिली स्टोअर्सचे मालक आप्पा उर्फ शिवराम वि.जोशी यांचे वृद्धापकाळाने (93व्या वर्षी) शनिवारी मध्यरात्री निवासस्थानी झोपेतच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुन, 2 मुली, जावई, नातवंडे आणि पतवंड असा परिवार आहे

नुकतीच 75 वर्ष पुर्ण केलेल्या फॅमिली स्टोअर्सने सचोटी ,दर्जेदार वस्तू आणि आप्पांच्या प्रत्येक ग्राहकांशी आपुलकीने वागण्याच्या स्वभावामुळे समस्त मुंबईकरांना आपलेसे केले होते.आप्पा यांनी व्यावसायिक चातुर्य आणि प्रामाणिक वागून मराठी माणूस अनेक वर्ष उत्तम व्यवसाय करू शकतो याचा आदर्श ठेवला आहे. त्यांचे संपुर्ण कुटुंब आप्पांच्या बरोबरीने त्यांच्याच व्यवसायात गेली अनेक वर्ष कार्यरत आहे

आपली प्रतिक्रिया द्या