दो गज सही, ये मेरी मिल्कियत तो है, ए मौत तूने मुझे जमींदार कर दिया; राहत इंदौरी गेले!

1292

जो आज साहिबे मसनद हैं, कल नहीं होंगे। किराएदार है जाती मकान थोडी हैं। सभी का खून हैं शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिन्दोस्तान थोडी हैं। अशा जबरदस्त शब्दांचा अंगार फुलवणारे, शायरीच्या मैफलीत बंडखोरीचे निशाण फडकवणारे ज्येष्ठ शायर, गझलकार डॉ. राहत इंदौरी यांचे आज निधन झाले. त्यांना न्युमोनिया झाला होता. त्यात कोरोनाचीही लागण झाली. इंदौर येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. दो गज सही, ये मेरी मिल्कियत तो है। ए मौत तूने मुझे जमींदार कर दिया। असे भन्नाट व्यक्त होणारा शायर असा अचानक निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे डॉ. राहत इंदौरी हे फक्त नियमित आरोग्य चाचण्यांसाठीच घराबाहेर पडत असत. चार दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांचा एक्सरे काढण्यात आला. न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोरोना चाचणी घेण्यात आली. रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यानंतर डॉ. राहत इंदौरी यांना अरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हृदयविकार, मधुमेहानेही ते ग्रस्त होते. आज सकाळी त्यांना लागोपाठ हृदयविकाराचे दोन धक्के बसले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचा मुलगा सतलज राहत यांनी दिली. ते 70 वर्षांचे होते.

चित्रपटसृष्टीत रमले नाहीत

डॉ. राहत इंदौरी यांचा जन्म 1 जानेवारी 1950 रोजी इंदौर येथे झाला. बरकतुल्लाह विद्यापीठातून त्यांनी उर्दुत एमए केले. त्यानंतर भोज विद्यापीठातून त्यांनी उर्दु साहित्यात पीएचडी केली. महेश भट यांच्या ‘सर’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा गीत लिहिले. मुन्नाभाई एमबीबीएस, मीनाक्षी, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन कश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, जानम, आशियाँ, मै तेरा आशिक या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. शायर, गझलकार असलेल्या राहत इंदौरी यांचे मन चित्रपटसृष्टीत फार काळ रमले नाही.

डॉ. राहत इंदौरी यांचे काही प्रसिद्ध शेर

 • दो गज सही ये मेरी मिलकियत तो है
  ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया 
 • ये हादसा तो किसी दिन गुजरने वाला था
  मैं बच भी जाता तो एक रोज मरनेवाला था 
 • अगर खिलाफ हैं, होने दो जान थोडी हैं
  ये सब धुआँ हैं कोई आसमान थोडी हैं 
 • लगेगी आग तो आएँगे घर कई जद में
  यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी हैं 
 • दोस्ती जब किसी से की जाये
  दुश्मनों से भी राय ली जाये 
 • शाख से टूट जायें वो पत्ते नहीं है हम
  आँधीयों से कोई कह दे कि औकात में रहे 
 • मजा चखाँ के ही माना हूं मैं भी दुनिया को
  समझ रही थी कि ऐसे ही छोड दूंगा उसे 
 • ना हम सफर, ना किसी हम नशीं से निकलेगा
  हमारे पाँव का काँटा हमीं से निकलेगा 
 • सभी का खून शामील है यहाँ की मिट्टी में
  किसी के बाप का हिन्दोस्तान थोडे ही है 
 • मैं जब मर जावू तो मेरी अलग पहचान लिख देना
  लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्थान लिख देना

मैफलीत जान आणणारा लोकप्रिय शायर

शायरीच्या दुनियेत डॉ. राहत इंदौरी यांची राहतभाई अशी ओळख होती. शायराना मैफलीची अदब सांभाळून शब्दांचे अंगार फुलवणारे राहतभाई बघता बघता मैफलीत जान फुंकत असत. शायरी पेश करताना अदाकारी करण्याची त्यांची खास लकब अतिशय लोकप्रिय झाली. खणखणीत आवाजात, शब्दांवर जोर देत आपल्या भावना ते रसिकांपर्यंत पोहचवत. देश विदेशात राहत इंदौरी हे प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचे अनेक मुशायरे प्रचंड गाजले. तरुणांमध्ये त्यांची खास लोकप्रियता होती. त्यांचे अनेक शेर थेट काळजाला भिडणारे आहेत. सरकारला थेट शब्दांत सुनावणारा शायर काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या