गंगाखेडच्या ब्राम्हणगाव फाट्यावर संतप्त शेतकर्‍यांचा रास्तारोको

498

परभणी येथील गंगाखेड रस्त्यावरील ब्राम्हणगाव फाट्याजवळील कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीस विलंब होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शुक्रवारी दुपारी रास्तारोको केला. येथील एका जिनिंग प्रेसिंगच्या संकलन केंद्रावर चार-सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कापसाची वाहने उभी आहेत. मात्र, खरेदीसाठी खूप विलंब होत आहे.

याबाबत संबंधित अधिकारी-कर्मचारी कोणतीही माहिती देत नाहीत. त्यामुळेच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना वाहन भाड्याचा नाहक आर्थिक फटका बसतो आहे. याला पूर्णतः यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्‍यांनी गोंधळाला सुरुवात केली. पाठोपाठ त्या निषेधार्थ गंगाखेड ते परभणी रस्त्यावर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या पध्दतीने आंदोलने करु नका, असे सआवाहन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या