मोदी सरकारविरोधात शेतकऱयांचा एल्गार! 8 डिसेंबरला ‘हिंदुस्थान बंद’!! आजच्या बैठकीकडे देशाचे लक्ष

घाईगडबडीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी ठाम असून, 8 डिसेंबरला मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारत ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. बंदवेळी देशभरातील टोलनाक्यांवर आंदोलन करण्यात येईल.

तसेच दिल्लीकडे येणारे सर्व रस्ते अडवण्यात येतील असा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱयांच्या ठाम निर्धारामुळे मोदी सरकारला घाम फुटला आहे. आज शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱयांमध्ये होणाऱया तिसऱया बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

कडाक्याच्या थंडीतही शेतकरी मागे हटलेले नाहीत. दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी बांधव ठाण मांडून आहेत. देशभरात शेतकरी येथे येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या