बीड जिल्ह्यात शिवसेनेचे शेतकरी पीक विमा मदत केंद्र

108

सामना प्रतिनिधी । बीड

पिक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसैनिक धावून आले आहेत. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बीड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शेतकरी पीक विमा मदत केंद्र स्थापन केले आहे. या मदत केंद्रामध्ये शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहे. पीक विमा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे संपर्कनेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील सहा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने शेतकरी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते अंबाजोगाई, वडवणी, माजलगाव येथील केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी सचिन मुळूक बोलताना म्हणाले, पीक विमा मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. पीक विमा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम करण्यासाठी शिवसेना सज्ज आहे असे ते म्हणाले. यावेळी धारूर, केज आणि परळी येथेही मदत केंद्र सुरू करण्यात आले. सर्व तालुकाप्रमुख, किसान सेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या